DCPS कपात पावत्या देणे व कपात रक्कम NPS मध्ये वर्ग करणे बाबत Dcps amount transfer nps Dec 2022
राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचान्यांना परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेतून राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत समाविष्ट करण्याची कार्यपध्दती शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक १९/९/२०१९ अन्वये विहीत करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या सर्व जिल्हा परिषद तसेच मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांचे राष्ट्रीय नित्तीयेतन क्रमांक सुरू करणे, नियमित कपात करणे कपात केलेली रक्कम संबंधितांच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन खात्यावर जमा करणे, चिया वाटप करणे परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजनेचा हिशोब पूर्ण करून सदरची रक्कम संबंधितांच्या कायम निवृत्तीवेतन (PRAN) खात्यावर जमा करणे याबाबत नुकतेच एक पत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे.
विषय:- भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांचा दि.३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या वर्षाचा अहवालानुसार राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेनुसार रक्कम नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) कडे वर्ग करण्याबाबत
संदर्भ :- १) वित्त विभागाचे पत्र क्र. संकीर्ण २०२२/प्र.क्र.५८/सेवा ४, दि.०१/१२/२०२२ २) शासनाचे समक्रमांकाचे दि. ०२/१२/२०२२ चे पत्र.
भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांचा दि.३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या वर्षाचा अहवालानुसार राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेनुसार रक्कम नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) कडे वर्ग करण्याबाबतचे मुद्यावर आज दि. ०७/१२/२०२२ रोजी १२.०० वाजता मा. मुख्य सचिव महोदया यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
सदर बैठकीमध्ये संचालक, लेखा व कोषागारे यांचे मार्फत शालेय शिक्षण विभागामार्फत मुख्य लेखाशिर्ष ८३४२०११७ (डिपोजिट) अंतर्गत खर्चाचा तपशिल सादर करण्यात आला. त्यामध्ये जमा ४३४४.१६ कोटी, खर्च ११७८.१३ कोटी व फरक ३१६६.०३ कोटी इतका दर्शविण्यात आला आहे. सदर बैठकीत मा. मुख्य सचिव यांनी याबाबतचे लेखे पूर्ण करून उर्वरित रकमा दि. ३१ डिसेंबर २०२२ रोजीपर्यंत वर्ग करावी, असे निर्देशित केले आहे:
शिक्षण संचालक (प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लेखे दि.३१ डिसेंबर, २०२२ पर्यंत पूर्ण करुन संबंधित रकमा राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत रितसर वर्ग करण्याची कार्यवाही करण्यात यावी. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेनुसार रक्कम नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) कडे वर्ग करण्याबाबत काही अडचणी येत असतील तर त्या करिता श्री. दत्तादास कराडकर, उप संचालक लेखा- व कोषागारे यांच्याशी संपर्क साधावा, तसेच त्यांच्याशी खर्चाचा ताळमेळ करण्यात यावा, याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करावा.
आपला
(स्मजितसिंह देओल) सचिव, शालेय शिक्षण
सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) संबंधित यांना खालिलप्रमाणे प्रमाणपत्र देण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत.
प्रमाणपत्र
प्रमाणित करण्यात येते की, ------जिल्हयातील राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांचे कर्मचारी कपाती. शासन हिस्सा व त्यावरील व्याजाची परिगणना यांचा हिशोब पूर्ण करुन चिठ्ठया वाटप केल्या आहेत व सदरची रक्कम संबंधितांच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन खात्यावर रक्कम रु.--------वर्ग केली आहे व उर्वरित रक्कम रु. ------------ लेखाशिर्ष- ८३४२०२७५ मध्ये तरतूद उपलब्ध झाल्यास वर्ग करण्यात येईल.
स्वाक्षरीत ...... स्वाक्षरीत
शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद
शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी केलेल्या सूचना
विषय:- परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजनेतील शि/ शिक्षकेतर कर्मचा-यांना वेतनातून कपात झालेली रक्कम व शासनाचा देय हिस्सा यांच्या हिशोबाच्या पावत्या देण्याबाबतची कार्यवाही ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करणेबाबत.
राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचान्यांना परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेतून राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत समाविष्ट करण्याची कार्यपध्दती शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक १९/९/२०१९ अन्वये विहीत करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या सर्व जिल्हा परिषद तसेच मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांचे राष्ट्रीय नित्तीयेतन क्रमांक सुरू करणे, नियमित कपात करणे कपात केलेली रक्कम संबंधितांच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन खात्यावर जमा करणे, चिया वाटप करणे परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजनेचा हिशोब पूर्ण करून सदरची रक्कम संबंधितांच्या कायम निवृत्तीवेतन (PRAN) खात्यावर जमा करणे इत्यादी, बाबांची कार्यवाही ३१ मार्च २०२२ पूर्वी करून या बाबीसाठी मंजूर असलेली तरतूद खर्च करणेबाबतच्या कार्यवाहीबाबत क्षेत्रिय कार्यालयांना या कळविण्यात आलेले आहे. तसेच राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये वर्ग (८३४२०२७५) मधील सन २१-२२ मंजूर तरतूद ३२०० कोटी असताना खर्च ४० कोटी झालेला आहे या चाचासाठी शासनाने संदर्भिय पत्र क्र.८ अर्धशासकीय पत्राव्दारे तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे व सदरील हिशोब तात्काळ पूर्ण करणे बाबत आपणास कळविलेले आहे.
दिनांक ०७/१२/२०१२ रोजी मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांचे कर्मचारी कपाती, शासन हिस्सा व त्यावरील व्याजाची परिगणना करून चिया वाटप करुन व सदरची रक्कम संबंधिताच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन खात्यावर जमा करणेबाबतची कार्यवाही डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात यावी असे निर्देश दिलेले आहेत. जर सदर ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण न झाल्यास आपणावर शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, असे निर्देश देण्यात आलेले आहेत.
तरी उपरोक्त सूचनानुसार कार्यवाही करून जिल्हा परिषद
प्राथमिक शिक्षकांकरिता डिसीपीएस योजनेतून एनपीएस योजनेत वर्ग करण्यासाठी आवश्यक
अनुदानाची माहिती सोबत जोडलेल्या नमुन्यात व सदर हिशोब पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र
दिनांक ३१/१२/२०२२ पर्यंत संचालनालयास तात्काळ ई-मेलद्वारा सादर करण्यात यावे.
(शरद गोसावी) शिक्षण संचालक (प्राथमिक)
महाराष्ट्र राज्य पुणे १
0 टिप्पण्या